'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी...', Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य

Nick Jonas on Wife Priyanka Chopra's Hindu Religion : निक जोनसनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पत्नी प्रियांकाच्यी हिंदू धर्मावर वक्तव्य केलं आहे. निक आणि प्रियांका हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. 

दिक्षा पाटील | Updated: May 23, 2023, 06:18 PM IST
'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी...', Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Nick Jonas on Wife Priyanka Chopra's Hindu Religion : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. 2018 साली प्रियांकानं निकशी राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यांनी एकदा पारंपारिक हिंदू पद्धतीनं आणि एकदा ख्रिश्चन परंपरेनं लग्न केलं. अमेरिकेत सेटल झाली असली तरी देखील प्रियांका ही सगळे भारतीय सण आनंदानं साजरा करताना दिसते. ते दोघेही बऱ्याचवेळा स्पॉट करण्यात येतात. प्रियांका आणि निक नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसतात. अशात निकनं पहिल्यांदाच त्यांची पत्नी प्रियांकाच्या धर्मावर भाष्य केलं आहे. 

प्रियांकानं नुकतीच ‘आर्मचेअर एक्सपर्ट विथ डॅक्स शेपर्ड’ यांच्याशी एका पॉडकास्ट निमित्तानं मुलाखत दिली होती. यावेळी निक म्हणाला, 'देवासोबत असलेलं माझं नातं खास आहे… पण आता देव आपल्याला अनेक रुपात दिसत आहेत… मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी हिंदू आहे. ज्यामुळे मला असंख्य गोष्टी शिकता आल्या, त्यानं प्रचंड प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे या धर्माबद्दल माझ्या मनात असणारा आदर आणखी वाढला. मालतीला आम्ही ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांची शिकवण देत आहोत. तिच्यात बायबल आणि हिंदू अशी दोन्ही तत्वे पाहायला मिळतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारतात आल्यानंतर निकला अनेकांनी जिजाजी किंवा जिजू हाक मारली होती. त्यात पापाराझींचा सगळ्यात जास्त समावेश होता. त्याविषयी विचारता निक म्हणाला होता की भारतात आल्यानंतर त्याला इथल्या लोकांकडून मिळणार प्रेम पाहता तो भारावून गेला होता, असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं. 

हेही वाचा : OTT Releases : एंटरटेंनमेंटचा धमाका! अ‍ॅक्शन, रोमान्स आणि सप्सेन्स... 'या' आठवड्यात ओटीटीवर होणार 'हे' चित्रपट प्रदर्शित

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निक आणि प्रियांका या दोघांचं लग्न 2018 साली झाले होते. तर त्यांच्या लग्नात चित्रपटसृष्टीत प्रियाकांचे काही जवळचे लोक आणि निक आणि प्रियांकाच्या कुटुंबातील सदस्याच उपस्थित होते. दरम्यान, निक आणि प्रियांका हे सरोगसीच्या माध्यमातून  गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 साली ते पालक झाले. त्यांनी मुलीला जन्म दिला असून तिचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असे आहे. दरम्यान, निक आणि प्रियांका हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच सगळ्यांनी मदर्स डे साजरा केला. या निमित्तानं निकनं प्रियांका आणि मालती मेरीचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी त्यानं प्रियांकाला त्याचं आणि मालती मेरीचं आयुष्य इतकं सुंदर बनवल्याचं म्हणतं मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर प्रियांका, निक आणि मालती हे काही दिवसांपूर्वीच भारतात ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उदघाटनाच्या निमित्तानं आले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रियांका कायम तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.. सोशल मीडियावर प्रियांका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते… प्रियांका हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे..