डोक्यावर तलवार, थिरकणारी कंबर...; Nora Fatehi चा अफलातून बेली डान्स पाहून व्हाल घायाळ

Nota Fatehi Viral Video : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा डोक्यावर तलवार घेऊन डान्स करताना दिसत आहे. तिच्या या डान्सनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून आता हा व्हिडीओ नक्की तिचाच आहे की दुसऱ्या मुलीचा असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2023, 08:01 PM IST
डोक्यावर तलवार, थिरकणारी कंबर...; Nora Fatehi चा अफलातून बेली डान्स पाहून व्हाल घायाळ  title=
(Photo Credit : Social Media)

Nota Fatehi Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने जवळपास जगभरात तिच्या डान्सची छाप सोडली आहे. तिने बऱ्याच गाजलेल्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या बोल्ड अदांचे लाखो चाहते आहेत. नोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असणाऱ्या नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

या व्हिडीओत नोरानं सलमान खान आणि कतरिना कैफच्या माश अल्लाह या गाण्यावर डान्स केला आहे. तिनं यावेळी बेली डान्स करत सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नोराने हिरव्या रंगाचा ब्रालेट आणि स्टील स्कर्ट परिधान केलं आहे.  हा व्हिडीओ शेअर करत नोराच्या चाहत्यानं कमेंट केली की नोरानं असा दावा केला आहे की तिचा जन्म हा 1992 चा असून ती आता 31 वर्षांची आहे. तर तिचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओत तिच्या 20 शीतला आहे. पण आता पाहायला गेलं तर नोरा फार वेगळी दिसते. एका नेटकऱ्याची ही कमेंट पाहता दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ती आता वेगळी दिसत असली तरी तिनं आजपर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि हा व्हिडीओ तिच्या करिअरच्या सुरुवातीचा आहे. तर तिसरा नेटकरी म्हणाला की, ही नोरा नसून तिच्या सारखी दिसणारी दुसरी मुलगी आहे. तर काही नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 

हेही वाचा : आता तर कहरच केला! शेणापासून ड्रेस बनवला... Urfi Javed च्या ट्रोलिंगची शिकार

Nora before bollywood?
by u/dil_mangoes in BollyBlindsNGossip

नोराच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर तिनं 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'Roar : टायगर ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर नोरा 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनमध्ये दिसली होती. याशिवाय नोरानं तेलगू चित्रपटात देखील अनेक सुपरहिट गाण्यामध्ये दिसली. तर सगळ्यांचा लक्षात राहिलेला बाहुबली : द बिगिननिंग या चित्रपटातील एका आयटम सॉन्गमध्ये नोरा दिसली होती. नोरा आता लवकरच सलमान खानच्या 'किक 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून नोरा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नोरानं आजवर 'दिलबर', 'कामरिया', 'ओ साकी साकी' आणि 'गरमी' या सुपरहीट गाण्याच्या बीटवर डान्स करत चाहत्यांच्याही  दिलावर राज्य करत गेली तसेच तिची हि गाणी सुद्धा ब्लॉकबस्टर ठरली.