Oscars 2024 live streaming : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 10 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या ओवेशन हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. ऑस्कर हा पुरस्कार सोहळा चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी असलेल्या सगळ्यात मानाचा पुरस्कार आहे. त्यामुळे त्या सगळ्या कलाकारांना याची आतुरतेनं प्रतिक्षा आहे ज्यांना यंदा नॉमिनेशन मिळाले आहे. या शोचे सुत्रसंचालन अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन जिम्मी किमेल करणार आहे. जर तुम्हाला भारतात हा अवॉर्ड शो पाहायचा असेल तर कधी आणि कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया.
अमेरिकेत हा पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या ओवेशन हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर भारतात हा पुरस्कार सोहळा सोमवारी म्हणजेच 11 मार्च रोजी सकाळी 4 वाजता लाइव्ह पाहता येणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा भारतात डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता. या आठवड्याच्या सुरुवातीला देशात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण करणार आहे. हे सगळे पुरस्कार कोण प्रेझेंट करणार याची यादी देखील समोर आली आहे. पुरस्कार प्रदाण करणाऱ्यांच्या यादीत अल पचिनो, ड्वेन जॉनसन, जेनिफर लॉरेंस आणि अनेक कलाकार आहेत. मात्र, यावेळी कोणत्याही भारतीय कलाकाराचे प्रेझेंटरच्या यादीत नाव नाही आहे. या आधीच्या ऑस्कर सोहळ्यात दीपिका पदुकोणनं प्रेझेंट केला होता. तर त्या आधी प्रियांका चोप्रावर ही जबाबादारी देण्यात आली होती.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटाला एकूण 13 नामांकन मिळाली आहेत. याशिवाय ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांमध्ये देखील चांगलीच चुरस रंगणार आहे. यात ‘पूअर थिंग्स’ ला 11 नॉमिनेशन्स मिळाले आहेत. तर मार्टिन स्कॉर्सेसीच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ ला 10 कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. तर सतत चर्चेच असलेल्या ‘बार्बी’ ला 8 कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. आता कोणते चित्रपट कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत.
हेही वाचा : अॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन, वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत दिग्दर्शिका निशा पहुजा यांच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्रीला नामांकन मिळालं आहे.