मुंबई : बॉलीवूडमध्ये कलाकार महागड्या वस्तूंमुळे नेहमी चर्चेत असतात. यामध्ये बॉलीवुड अभिनेत्रींचं नाव सर्वात पुढे आहे. प्रियंका चोप्रा नेहमी आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. नुकताच एका कार्यक्रमात ती दिसली होती. त्या इवेंटसाठी तिने खाल निळा रंगाचा जंपसूट घातला होता.
या जंपसूटमध्ये प्रियंका खूपच कूल दिसतेय. पण या ड्रेसची किंमत ऐकली तर तुम्हाला ही धक्का बसेल. प्रियंकाच्या या ड्रेसची किंमत जवळपास 1,46,350 रुपये आहे. देसी गर्लची फॅशन आणि तिची पसंद वेगळी आहे.
प्रियंकाने कही दिवसांपूर्वीच किड लाइक जॅकचा ट्रेलर रिलीज केला. याशिवाय तिची आगामी टीव्ही सीरीज क्वाटिंको देखील लवकरच सुरु होणार आहे.