Raveena Tandon on Aishwarya Rai : 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडनला चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. तिला कधी कोणी बॉडी शेमिंग केली. या सगळ्यात त्यावेळी ती काही बोलू शकत नव्हती आणि त्यामुळे तिला हेल्पलेस वाटायचं. खरंतर तिचं म्हणणं आहे की आता सगळं काही बदललं आहे आणि आता सोशल मीडियाच्या मदतीनं ज्या व्यक्तीला जे वाटतं ते स्पष्टपणे मांडू शकतात. आता ती अशा लोकांना उत्तरही देऊ शकते आणि अर्थ नसलेल्या गोष्टींचा विरोधही करु शकते.
मोजो स्टोरीसाठी बरखा दत्तशी बोलताना रवीना टंडन 90 च्या दशकाला आठवलं. या दरम्यान, तिनं बॉडी शेमिंगविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तिनं बरखा दत्तला सांगितलं की कशी ती ऐश्वर्या राय बच्चनच्या बाजूनं उभी राहिली होती. जेव्हा लेक आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याला बॉडी शेमिंग करण्यात येत होतं. रवीनानं पुढे हा देखील खुलासा केला की आराध्याच्या जन्मानंतर मीडियामध्ये बॉडी शेमिंग करण्यात येत होती. रवीनानं पुढे हा देखील खुलासा केला की आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या लाइमलाइटपासून दूर झाली होती. त्यावेळी तिला माहित होतं की ती सगळ्यात चांगली दिसते आणि तिला पुन्हा तिच्या बॉडी शेपमध्ये येण्यासाठी घाई करायची नव्हती.
पुढे चर्चा सुरु असताना रवीनाला विचारण्यात आलं की अनेकवर्ष ही गायब राहिल्यानं तिला त्याचं वाईट वाटतं का? यावर उत्तर देत रवीना म्हणाली की मुळीचं नाही, कारण तिला कॅमेरा फ्रेंडली होण्याचा दबाव नको होता. कारण एक ते दिवस होते जेव्हा प्रत्येकाचे तिच्या शरीरावर लक्ष होते तिला लाज वाटेल असं त्यांना नेहमी वाटायचंय.
हेही वाचा : ...आणि तो; लग्नांच्या चर्चांमध्ये अदिती राव हैदरीनं शेअर केला खास फोटो
रवीना पुढे म्हणाली की कसं बाळाच्या जन्मानंतर ऐश्वर्यावर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे तिनं लोकांपासून लांब राहणं ठरवलं. जो पर्यंत शक्य आहे तो पर्यंत तिनं बाळाला सांभाळलं. त्यावरच तिनं लक्ष केंद्रित केलं. ती त्यावेळी डायट करण्याकडे किंवा वर्कआऊट करण्याकडे लक्ष देत नव्हती. रवीनानं पुढे सांगितलं की ऐश्वर्याच्या वेळी तिनं मीडियाला एक पत्र लिहितं तिचं समर्थनं करत आणि या गोष्टीवर भर देत सांगितलं की तिला जेव्हा कामावर परतायचं असेल तेव्हा तो तिचाच निर्णय असेल.