मुंबई : भारतामध्ये अनेक वादविवादानंतर अखेर 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. करणी सेनेसह अनेक राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.
भारताप्रमाणेच मलेशियामध्येही 'पद्मावत'ला विरोध झाला आहे. मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डाने (एलपीएफ) संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत'ला रिलीज होण्यापासून रोखले आहे.
'वेराईटी. डॉट कॉम' ने दिलेल्या माहितीनुसार, एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद जामबेरी अब्दुल अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये मुसलमान अधिक प्रमाणात आहेत. या चित्रपटाची कहाणी मुसलमानांसाठी संवेदनशील ठरू शकते. हा धोका पाहता चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
16 व्या दशकामध्ये कवि मलिक मोहम्मद जायसी यांच्या रचनांवर 'पद्मावत' हा चित्रपट बेतला आहे. काही रजपूत संघटानांनी ऐतिहासिक संबंधांची मोडतोड केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
'पद्मावत' चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत झळकले होते.