सलमान खानला या अभिनेत्रीने घातली होती भुरळ, करणार होता लग्न; पण...

 अनेकवेळा सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला

Updated: Jan 16, 2022, 12:54 PM IST
सलमान खानला या अभिनेत्रीने घातली होती भुरळ, करणार होता लग्न; पण... title=

मुंबई : सुपरस्टार सलमान खान 56 वर्षांचा झाला असला तरी आजही तो अजूनही एकटं आयुष्य जगत आहे. अनेकवेळा त्याला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला पण या प्रश्नावर त्याने नेहमीच फिरवून फिरवून उत्तर दिली. दरम्यान, सलमान खानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, त्याला जुही चावलासोबत लग्न करायचं होतं. पण अभिनेत्रीच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला.

सलमानने सांगितला किस्सा
व्हिडिओमध्ये सलमान खान खूपच यंग दिसत आहे. जेव्हा होस्ट त्याला विचारते, जुही चावलाबद्दल सांग. तेव्हा उत्तरात सलमान खान म्हणतो, जुही चावला खूप गोड आहे. मी एकदा तिच्या वडिलांशी लग्नाबद्दल बोललो होतो पण त्यांनी साफ नकार दिला. त्यांना काय हवं होतं माहीत नाही. पण मला वाटलं की, जर त्यांनी नकार दिला असेल तर त्यांनी विचारपूर्वकच निर्णय दिला असेल.

जूहीने जय मेहतासोबत केलं लग्न
जुही चावलाने जय मेहताशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं असून त्यांची नावं जान्हवी आणि अर्जुन आहेत. जुही चावलाचे पती मेहता ग्रुप या मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या दोन सिमेंट कंपन्याही आहेत. याशिवाय, ते शाहरुख खानसह आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक आहेत.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत काम केलं होतं. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.