Shaakuntalam Box Office Day 1 Collection : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून नुकताच तिचा 'शाकुंतलम' (Shaakuntalam) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटासाठी समंथानं खूप जास्त मेहनत घेतली. तिला चित्रपटादरम्यान, गंभीर आजार झाला होता. तरी देखील ती काम करत राहिली. आता तिच्या मेहनतीचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. कारण चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे.
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींग विषयी बोलायचे झाले तर चित्रपट समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार बोलायचे झाले तर चित्रपटानं पहिल्याच दिवशी 2 ते 4 कोटींच्या मध्ये होती. तर रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 5 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, समंथाच्या चित्रपटाचं इतर दाक्षिणात्य चित्रपटांच्या कलेक्शनशी तुलना केली तर चित्रपटानं इतकी चांगली कमाई केली नाही. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या Ravanasura या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 8.5 कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली असली तरी नंतर प्रेक्षकांवर जादु करण्यास अपयशी ठरला. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांचे लक्ष हे विकेंडकडे लादले आहे. तर दुसरीकडे समंथाला बरं नसून ती सध्या आराम करत आहे.
शाकुंतलम विषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचं बजेट हे 80 कोटींच्या जवळपास आहे. तर चित्रपटाला इतकी कमाई करायची असेल तर सुरुवातीच्या काही दिवसात चांगली कमाई करणं गरजेच आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन गुणशेखर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची पटकथा ही कालिदास यांनी लिहिलेल्या शाकुंतलम या नाटकावर आधारीत आहे. समंथानं चित्रपटात शाकुंतलम ही भूमिका साकारली होती आणि देव मोहननं पुरुवंशच्या राजा दुष्यंतची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात समंथासोबत पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लेक अल्लू अरहा देखील या चित्रपटात दिसली. त्याशिवाय बॉलिवूड कलाकार मधु शाह आणि सचिन खेडेकरही या चित्रपटात आहेत.
Hoping you all like the lil Cameo by #AlluArha . Spl thanks to Guna garu for introducing her on screen and taking care of her so preciously . Will always cherish this sweet moment .
— Allu Arjun (@alluarjun) April 14, 2023
हेही वाचा : राहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..."
अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाकुंतलमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना माझी अल्लु अरहाची पाहुण्या कलाकाराची भूमिका आवडली असेल. तिला मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी आणि तिची इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी गुना गरुचे खूप खूप धन्यवाद. आम्ही नेहमीच या गोष्टी लक्षात ठेवू. तर अल्लू अर्जुनची मुलगी ही 6 वर्षांची आहे.