'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया

Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 7, 2023, 02:18 PM IST
'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील कथानकानं अनेक प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत. चित्रपटातील सगळ्यात जास्त कोणती गोष्ट चर्चेचा विषय ठरली असेल तर ती रणवीर सिंग आणि आलियाची केमिस्ट्री नाही तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन. त्या लव्ह बर्ड्सवर आधारीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या किसिंग सीनवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात आता धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सगळ्यात आधी धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर धर्मेंद्र यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलनं त्याची काय प्रतिक्रिया आहे ते सांगितले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतती सनी देओलला या किसिंग सीन विषयी विचारता म्हणाला की, माझ्या वडिलांना जे पाहिजे ते करू शकतात आणि ते फक्त एक अभिनेता आहेत. मी तर म्हणणेन की त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं असं कोण करू शकतं. मी अजून हे पाहिलेलं नाही, मी फक्त त्या विषयी ऐकून आहे. मी चित्रपट पाहिलाच नाही. मी इतके चित्रपट पाहत नाही. मी स्वत: चा चित्रपट अनेकदा पाहत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटातील सीनविषयी वडिलांशी बोलणं झालं की नाही यावर उत्तर देत सनी देओल म्हणाला, नाही, मुळात माझ्या वडिलांशी मी या विषयावर चर्चा कशी करू शकतो? ते एक अशी व्यक्तीमत्त्व आहे जे काहीही आणि कोणतीही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे मोठ्या पडद्यावर दाखवू शकतात. त्याच कारण त्यांच्यात असलेला प्रामाणिकपणा आणि नम्रता आहे. 

हेही वाचा : थलैवासाठी काहीपण... 'जेलर' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी जाहीर

सनी देओलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'गदर 2' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमीशा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनिल शर्मा आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा करत आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.