मुंबई : बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचे असंख्य चाहते आहेत. सनी लिओनीची झलक पुन्हा-पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उतावळे असतात. आपला हटके अंदाज आणि कामाच्या जोरावर सनीने बॉलिवूडमध्ये आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानसोबत काम केलं आहे आणि लवकरच सलमानसोबत सिनेमात झळकणार आहे. पण तुम्हाला या हॉट अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल.
होय, सनी लिओनीच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्हाला माहिती नसेल.
सनी लिओनी बहूतेक कार्यक्रमांत किंवा अवॉर्ड शोजमध्ये आपला पती डेनियलसोबत उपस्थित राहते. पण, प्रत्येक कार्यक्रमात सनी लिओनी पतीसोबत उपस्थित का राहते? असा प्रश्न अनेकांना पडतो.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्रीत काम करत होती. मग, बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर सनी लिओनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत सनीने सांगितले की, त्यावेळी बॉलिवूड सेलिब्रेटी तिच्यापासून दूर पळत असतं. इतकचं नाही तर, तिच्यासोबत हाय, हॅल्लोही करत नसतं.
सनीने आपल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा पहिल्यांदाच ती अवॉर्ड शोमध्ये गेली होती त्यावेळी अनेक सेलिब्रेटीजने तिच्यासोबत बसण्यास नकार दिला होता. तसेच तिच्यासोबत फोटो काढण्यासही नकार दिला होता. कारण, सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्रीतून आल्याने अनेकजण सनीपासून दूर राहत होते.
सनीसोबत कुणीही मैत्री करण्यास तयार नसल्याने ती एकटी पडली होती त्यामुळेच ती आपला पती डेनियल याला सोबत घेऊन प्रत्येक कार्यक्रमात जात असे. डेनियल केवळ सनीसोबत उपस्थित राहत नाही तर प्रत्येकवेळी सनीला प्रोत्साहनही देतो.