Taimur Ali Khan's nanny: सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे बॉलिवूडमधील आयकॉनिक जोडप्यांपैकी एक आहेत. तसेच तैमुर अली खानचादेखील चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तैमुरला पाहण्यासाठी आणि त्याचे गोड फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी 24 तास सैफ-करिनाच्या घराभोवतीच असायचे. तैमुरसोबत त्याच्या नॅनीचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तैमुरच्या नॅनीचे नाव ललिता डिसिल्वा आहे. मात्र, ललिता डिसिल्वा आता तैमूरच्या नॅनी म्हणून काम करत नाहीत. जवळपास 4 ते 5 वर्षे त्यांनी तैमूरच्या नॅनीचे काम केले आहे. एके काळी तैमुरमुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या.
अलीकडील एका मुलाखतीमध्ये ललिता डिसिल्वा यांनी काही अफवांना पूर्णविराम लावला होता. त्या म्हणाल्या की "करीना एक खूप वेगळीच आई आहे. ती खूप नियमबद्ध असून तिची मुले ही तशीच आहेत. सैफ कधीही मुलांसोबत मिळून मिसळून जातो." पुढे त्या अडीच लाख रुपयांच्या वेतनाबाबत म्हणाल्या की "अडीच लाख रुपये इतके वेतन मिळवे असे मला वाटते पण, या सगळ्या अफवा आहेत".
जवळपास 4 ते 5 वर्षे तैमुरच्या नॅनी असलेल्या ललिता डिसिल्वा यांनी करीनाला विचारले की "अडीच लाख रुपये इतके वेतन मला नक्कीच मिळणार आहे का?" तेव्हा करीनाचं अगदी सरळ आणि साधारण उत्तर होतं. "या सगळ्या अफवा आहेत, तुम्ही यांना गांभीर्याने घेऊ नका" असं उत्तर देत करीनाने या अफवा असल्याचं स्पष्ट केलं.
'बेबो' नावाने ओळखली जाणारी करीना 'स्ट्रिक्ट मदर'देखील आहे. ती नेहमी कौटुंबिक कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सैफ आणि करिनाने 16 ऑक्टोबर 2012 मध्ये लग्नबंधनात आडकले होते. आता करिना-सैफचा मोठा मुलगा तैमुर आठ वर्षांचा तर छोटा जेह तीन वर्षांचा आहे.
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर सगळीकडे पटौदी कुटुंबाविषयी अनेक गोष्टींना तोंड फुटलं आहे. असे सांगितले जात आहे की आरोपी 2 वाजेपर्यंत सैफच्या घरात दबा धरून बसला होता. आता याचं कारणामुळे त्यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.