Saif Ali Khan Stabbed News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने पहिली पत्नी अमृता सिंहसोबत 13 वर्षे संसार केला. नंतर या दोघांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. पण एक काळ असा होता जेव्हा अमृता सैफ अली खानला त्याच्या नकळत झोपेच्या गोळ्या देत असतं. फिल्ममेकर सुरज बडजातीयाने याबाबत स्वतः खुलासा केला आहे. याचा संबंध एका सिनेमाच्या शुटिंगशी असल्याच सांगण्यात आलं आहे. नेमकं कारण काय ते पुढे वाचा.
'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या चित्रपटात सैफसोबत करिश्मा कपूर, सलमान खान, सोनाली बेंद्रे, मोहनीश बहल आणि तब्बू यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. एका मुलाखतीत, सूरज बडजातिया यांनी 'हम साथ साथ है'च्या सेटवर खुलासा केला की, निर्मात्यांना अपेक्षित असलेला शॉट देण्यासाठी सैफ अली खान त्या स्थितीत नव्हता. रात्री त्याची चांगली झोप न झाल्यामुळे त्याला शुटिंग करणं कठीण होत होतं.
बडजातिया यांनी पुढे सांगितलं की, सैफ अली खानच्या खासगी आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळत होते. याकाळातच 'हम साथ साथ है' या सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. त्या काळात तो एका तणावातून जात असल्याच दिसत होता. यामुळे 'सुनो जी दुल्हन' या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान हा बदल प्रकर्षाने जाणवत होता. सैफ सारखा रिटेक घेत होता. त्या काळात हे पात्र चांगल्या प्रकारे कसं साकारता येईल याच्यासाठी तो विचार करत होता. आणि संपूर्ण रात्र झोपला नाही.
त्यावेळी सैफची पहिली पत्नी अमृताशी संवाद साधल्यावर कळलं की, त्याच्या खासगी आयुष्यात काही सुरळीत सुरु नाही. तेव्हा सुरज बडजातिया यांनी स्वतः अमृताला सल्ला दिला की, त्याच्या नकळत त्याला झोपेच्या गोळ्या द्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चांगली झोप झाल्यामुळे सैफ अली खानने सगळे सिन छान आणि रिटेक न घेता दिले. तसेच गाण्याचं शुटिंग देखील चांगल चित्रित झालं.