चित्रपट निर्माता निखिल द्विवेदी यांनी 'नागिन' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. चित्रपटाचे निर्माते निखिल द्विवेदी यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक स्क्रिप्ट फोटो शेअर करत 'प्रेम आणि बलिदानाची एक महाकथा' असे लिहिले आहे. त्यांनी त्या स्टोरीवर हे ही लिहिले, 'मकरसंक्रांती आणि अखेरचं....' या पोस्टनंतर, श्रद्धा कपूर आणि निखिल द्विवेदी यांच्या कामाचे चाहते अधिक उत्सुक झाले आहेत आणि आगामी चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरु होईल याची माहिती मिळाल्याने आनंदाच्या लाटा उमठल्या आहेत.
श्रद्धा कपूरची उत्कंठा आणि 'नागिन'चा लूक
श्रद्धा कपूरने 'नागिन' बनण्याबाबत तिने 2020 मध्ये ट्विटरवर या भूमिकेसाठी तिची उत्कंठा व्यक्त केली होती. श्रद्धा म्हणाली होती, 'माझ्यासाठी नागिनची भूमिका अत्यंत खास आहे. मला श्रीदेवीचा 'नगीना' चित्रपट खूप आवडला होता आणि अशा कथेवर काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती.' श्रद्धाच्या या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तिच्या चाहत्यांनीही या भूमिकेसाठी तिच्या तयारीबद्दल आनंद व्यक्त केला.
श्रद्धा कपूरने 'नागिन'च्या भूमिकेसाठी एक सखोल तयारी सुरू केली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी निखिल द्विवेदी आणि टीम मेहनत घेत आहेत आणि त्याचे सेट, कॅमेरा आणि इफेक्ट्सच्या बाबतीत एक उत्तम सुपरनॅचरल अनुभव देण्याचे लक्ष ठरवले आहे.
'नागिन' आणि श्रद्धा कपूरच्या आगामी प्रोजेक्ट्सची जोरदार सुरूवात
श्रद्धा कपूरच्या मागील चित्रपट 'स्त्री 2'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, त्यात तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चित्रपटाने 800 कोटी रुपयांची कमाई केली. 'स्त्री 2'मध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी होते. अक्षय कुमार यानी चित्रपटात कॅमिओ देखील केला. तसेच तमन्ना भाटियाच्या गाण्यानेही चित्रपटाला लोकप्रियतेत भर घातली. श्रद्धा कपूरच्या आगामी 'नागिन'मुळे तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा: कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक
चित्रपटात श्रद्धा कपूरसह इतर कलाकारांची निवड होण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. 'नागिन' या चित्रपटाची कथा एक सुपरनॅचरल थ्रिलर असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीस, श्रद्धा कपूर तिच्या भूमिका साकारण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी करत आहे, ज्यामुळे 'नागिन' तिच्या चाहत्यांसाठी एक अप्रतिम अनुभव ठरेल.
चित्रपटाची अपेक्षित रिलीज
चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ 2025 मध्ये होण्याची अपेक्षा आहे आणि 'नागिन' हा चित्रपट 2026 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'नागिन'च्या या प्रवासात, श्रद्धा कपूरचा 'नागिन' लूक आणि त्याची प्रेक्षकांवर होणारी छाप निश्चितच एक आकर्षण ठरणार आहे.