दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी

Saif Ali Khan Attack Health Update: सैफ अली खानला रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 16, 2025, 03:20 PM IST
दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टरांनी दिली माहिती

Saif Ali Khan Attack Health Update: अभिनेता सैफ अली खानवर रात्री तीन वाजल्याच्या सुमारास राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. वांद्र्यातील राहत्या घरात ही घटना घडल्यानंतर सैफ अली खानला त्याच्या थोरला मुलगा इब्राहिम अली खानने घरातील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने लिलावती रुग्णालयामध्ये (Lilawati Hospital) दाखल केलं. रात्री सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती लिलावती रुग्णालयाने दिली. आता त्यानंतर लिलावती रुग्णालयाने सैफ अली खानच्या प्रकृतीसंदर्भातील पहिलं ब्युलेटीन (Saif Ali Khan Health News) जारी केलं आहे. यामध्यै सैफवर दोन शस्रक्रीया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच सैफच्या शरीरामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता तो ही बाहेर काढण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

लगेच उपचार सुरु करण्यात आले

"एकूण 6 जखमा होत्या. त्यातील 2 जखमा खोलवर असून त्या गंभीर स्वरुपाच्या आहेत. सैफला रुग्णालयात आणण्यात आल्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले," असं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, "गंभीर जखम बघता शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे," असं सांगितलं. तसेच सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. "आता प्रकृती स्थिर असून सैफ यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. 3 मुख्य डॉक्टरांची टीम तसेच अन्य काही डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती मॉनिटर करत आहे. प्राकृतिबाबत आता चिंतेची बाब नाही," असं लिलावतीच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. लिलावती रुग्णालयाच्यावतीने न्यूरोसर्जन डॉ. नितिन डांगे आणि लिलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ.नीरज उत्तमानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दोन वाजता रुग्णालयात आणलं

"सैफ अली खानला रात्री 2 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला होता. त्याच्या पाठीत सुरा खुपसण्यात आला होता. त्याच्या मणक्याला इजा झाली आहे. त्याच्या पाठीतून सुरा काढण्यात आला असून त्याच्या मणक्यामधून होणारा स्पायनल फ्युईडचा प्रवाह रोखण्यात शस्रक्रीयेमुळे यश आलं आहे. तसेच त्याच्या डाव्या हातावर दोन खोलवरच्या जखमा असून त्याच्या मानावेरील वार झाल्याने आलेल्या व्रणावर प्लॉस्टीक सर्जरी करण्यात आली आहे," असं डॉक्टर डांगे यांनी सांगितलं आहे.

नक्की पाहा >> येरझऱ्या घालणारी करिना, रिक्षा अन्... Saif Ali Khan वरील Attack नंतरचा पहिला Video

तसेच "सैफची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून तो आता वेगाने रिकव्हर होतो आहे. तो पूर्णपणे धोक्यातून बाहेर आहे," असं डॉ. डांगे म्हणाले.

डिस्चार्जबद्दल काहीच बोलले नाही

सैफ अली खानला कधी डिस्चार्ज देणार याबद्दल डॉक्टरांनी सध्या तरी कोणतीही माहिती दिलेली नाही. डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मॅटिक सर्जन डॉक्टर लिना जैन, अॅनेथोलॉजिस्ट निशा गांधींची टीम सैफ अली खानवर उपचार करत आहेत. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनीही प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये सदर प्रकार हा चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराबरोबर झटापटीतून घडला असल्याचं सांगितलं आहे.