Saif Ali Khan Latest Updates in Marathi: अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेतल्या घरी घुसून चाकूने हल्ला केलेल्या अज्ञात व्यक्तीबाबत तपास सुरू आहे. या चाकू हल्ल्याची चौकशी सुरू असताना पोलिसांनी त्याचा स्निफर डॉग आणला अभिनेत्याच अपार्टमेंट असलेल्या ''सतगुरु शरण'' या इमारतीच्या बाहेर स्निफर डॉग दिसतोय.आता याच्यामदतीने पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काल रात्री अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. एका आरोपीने पायऱ्यांचा वापर करुन सैफ यांच्या घरी गेला. आतापर्यंतच्या चौकशीत चोरीच्या दृष्टीकोनातून हल्ला झाल्याच कळतंय. एका आरोपीची ओळख पटली आहे. अज्ञात हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने फायर एक्झिटच्या मदतीने सैफ अली खानच्या घरी घुसल्याची माहिती पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम म्हणाले. 10 शोध पथक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे. एका आरोपीची हालचाल सीसीटीव्हीत दिसतेय. त्या दिशने शोध सुरु आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपशील सांगितला जाईल असे ते म्हणाले.
#WATCH | Over attack on Actor Saif Ali Khan,
Dixit Gedam, DCP Zone 9, Mumbai Police says, "Last night, "The accused used a fire escape staircase to enter Saif Ali Khan's house. It appears to be a robbery attempt. We working to arrest the accused. 10 Detection teams are working… pic.twitter.com/g6oLZH9w7f— ANI (@ANI) January 16, 2025
आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय.चोरीचा उद्देशाने आरोपी सैफ अली खानच्या घरी घुसल्याची प्राथमिक माहिती
पायऱ्यांनी हल्लेखोर घरी घुसल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांच्या दहा पथकं तयार करण्यात आली आहेत. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
कुठल्याही गॅंग चा अँगल नाहीय. जी काही बाबा सिद्धकी, सलमान खान यांच्याबाबत घटना झाली त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही.चोरीचा प्रकार हा आहे असे दिसून येते.चोर घराच्या मागच्या भिंती वरून चढला होता.चार माळ्याची बिल्डिंग आहे त्या चार माळ्याच्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कमी होते.एका सीसीटीव्हीतून त्याचा चेहरा समोर आलेला आहे..तो फोटो आमच्या इन्फर्मन यांना पाठवलेला आहे. लवकरच आरोपीला पकडले जाईल पण यात कुठलाही गँग्स अँगल नाही, असे योगेश कदम म्हणाले. फक्त सैफ अली खानचा आडनाव खान आहे म्हणून राजकारण काही लोक करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाकावरून फेकले आहे. आता तुम्ही विरोधी भागावर आहात पण काहीही बरळत राहाल.याला आम्ही अजिबात खपू देणार नाही.जितेंद्र आव्हाड यांनी इतकं लक्षात घ्यावं. या घटनेला सामाजिक आणि राजकीय रंग देणे म्हणजे त्यांची राजकारणातील परिपक्वता किती आहे हे लक्षात येतं, असे ते म्हणाले.