8th Pay Commission Approval: देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यााधीच्या वेतन आयोगाची समिती 7 व्या वेतन आयोगासाठी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. 2026 पासून 8 व्या वेतन आयोगवर काम सुरु होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 व्या वेतन आयोगाला मंजूरी दिली आहे. 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ आता 2026 पर्यंत राहील. यानंतर आठव्या वेतन आयोगाची समिती तयार होईल. 8 वा वेतन आयोग मिळणार की नाही, यावर शंका उपस्थित केली जात असताना हा निर्णय घेण्यात आलाय. 7 वा वेतन आयोगाच्या समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर आठव्या वेतनच्या समितीला मंजूरी देण्यात येईल, असे आधीपासून म्हटले जात होते. व्या आयोगाचे गठन होण्यासोबत पगारवाढदेखील होईल. पण आता केव्हापर्यंत लागू होईल, याची कोणती डेडलाईन नाहीय. आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाणार आहे.