'टायगरला त्याची छोटी मुलगी भेटली....' तो व्हिडीओ पाहून कळेलं सर्व प्रकरण

अभिनेत्याच्या मिठीत अभिनेत्री दिशा पटाणी नाही, तर 'ही' सुंदर मुलगी... कोण आहे 'ती'?  

Updated: Apr 26, 2022, 08:45 AM IST
'टायगरला त्याची छोटी मुलगी भेटली....' तो व्हिडीओ पाहून कळेलं सर्व प्रकरण title=

मुंबई : झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी वाऱ्यासारख्या पसरत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. पण अशी संधी फार कमी लोकांच्या नशीबात असते. एका चाहतीची तिच्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफला भेटण्यासाठी भावुक झालेली चाहती...  आणि टायगरनो तिला मारलेली मिठी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली, तर काहींनी मात्र त्या चाहतीला आणि टायगरला ट्रोल केलं. व्हिडीओमध्ये टायगरला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकचं गर्दी केली. पण त्या गर्दीमधील एका चाहतीला भोवळ आली....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहतीला भोवळ आल्यानंतर जवळ असलेली लोकांनी तिला पाणी दिलं, पण तिला टायगरला भेटायचंच होती. अखेर तिची आणि टायगर भेटते... टायगर तिला जवळ घेतो...

या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने, 'टायगरला त्याची छोटी मुलगी भेटली....' असं लिहलं.. तर अनेकांनी 'लहान मुलगी आहेस का? अशी कमेंट केली आहे.