वरुण आणि श्रद्धा एकमेकांना लहानपणापासूनचं ओळखत होते आणि श्रद्धाने एकदा सांगितले होते की, लहानपणी तिने वरुणला प्रपोज केलं होतं, पण वरुणने तिला नकार दिला होता. वरुणने याबद्दल खुलासा केला आणि सांगितलं की, 'श्रद्धा ने मला मारहाण केली होती आणि तो खूपच 'फिल्मी' सीन होता'
वरुणने सांगितलं की, ते दोघं 8 वर्षांचे असताना श्रद्धा त्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी डोंगरावर घेऊन गेली होती आणि तिने मला प्रपोज केले होते. त्यानंतर वरुणने एक मजेदार किस्सा शेअर केला.
वरुणने सांगितलं की, श्रद्धाच्या दहाव्या वाढदिवसाच्या पार्टीत ती फ्रॉक घालून आली होती आणि तिने त्याला पार्टीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी जवळपास तीन ते चार मुलं होती ज्यांना श्रद्धा खूप आवडत होती. वरुण म्हणाला, 'मी जंपिंग बॅगवर खेळत होतो, तेव्हा त्या मुलांनी मला विचारलं, 'तुला श्रद्धा का आवडत नाही?'
वरुण म्हणाला, 'मी त्यांना सांगितलं की, मला मुलींमध्ये रस नाही, फक्त नृत्य स्पर्धेतील इंटरेस्ट आहे.' त्यावर त्या मुलांनी त्याला 'नाही, तुला ती आवडायलाचं पाहिजे' असं सांगितलं आणि वरुण नाही म्हणाल्यामुळे त्याला त्या मुलांनी मारहाण केली पुढे वरुण हसत म्हणाला, 'त्यांनी मला खूप मारले, कारण मी त्या मुलांना हो म्हणून सांगितलं नाही.'
वरुणने आणखी एक आठवण सांगितली, जेव्हा श्रद्धा 15-16 वर्षांची होती आणि खूप सुंदर दिसायला लागली होती. त्यावेळी वरुण श्रद्धाच्या शाळेत दांडिया स्पर्धेत दांडिया खेळायला आलेला आणि तो दांडिया खेळताना काठीने कोणाला तरी मारून लपण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला श्रद्धा हळूहळू जवळ येताना दिसली. वरुण म्हणाला, 'त्यावेळी मला जाणवलं की, कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल.'
हे ही वाचा: http://marathiadmin.india.com/marathi/entertainment/the-legendary-actor-...
आजवर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच श्रद्धाच्या 'स्त्री 2' मध्ये वरुणने एक कॅमिओ देखील केला होता, ज्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
2024 मध्ये एका मुलाखतीत श्रद्धा कपूरला विचारलं की ती पुन्हा कधी वरुणसोबत पडद्यावर दिसणार आहे. त्यावर श्रद्धा म्हणाली, 'आम्हाला तुमच्याकडून खूप प्रेम मिळालं आहे, त्यामुळे आम्हाला योग्य चित्रपट निवडावा लागेल, जेणेकरून तुम्ही म्हणाल, होय, आम्ही योग्य चित्रपटात एकत्र आलो आहोत.'