Prasad Khandekar's Father's Death Connection with Chhota Shakeel : छोट्या पडद्यावरील कॉमेडी मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याच कार्यक्रमातील अभिनेता प्रसाद खांडेकरची वेगवेगळी स्कीट आहेत जे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. प्रत्येक चाहत्याला जसं आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायचं असतं त्याच प्रमाणे प्रसादच्या चाहत्यांच्या बाबतीतही आहे. सगळ्यांना त्याच्या कुटुंबातील लोकांविषयी जाणून घ्यायचं असतं. आज आपण प्रसादच्या वडिलांची हत्या करण्यासाठी छोटा शकीलनं दहशतवादींना सुपारी दिली होती.
आज प्रसाद यशस्वी असला तरी त्याचं हे यश पाहण्यासाठी त्याच्यासोबत त्याचे वडील नाहीत. प्रसाद जेव्हा 14 वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. प्रसादच्या वडिलांचे नाव महादेव खांडेकर. ते बोरिवलीच्या शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख होते. तर प्रसाद लहान असताना त्याच्यात वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी त्याच्या वडिलांनी ग्रंथालयात त्याची नोंदणी केली. पण प्रसादला पुस्तक नाही तर कॉमिक्स वाचायला आवडचे. तो फक्त चंपक, चांदोबा हे कॉमिक बुक आणून वाचायचा. हे जेव्हा त्याच्या वडिलांनी पाहिले तेव्हा ते खूप संतापले आणि त्यांनी प्रसादला रामचंद्र सडेकरांचं ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक वाचण्यास सांगितलं. पण प्रसादला हे पुस्तक बरेच दिवस मिळालं नाही. एकदिवस त्याला हे पुस्तक मिळालं खरं... पण ते तो त्याच्या वडिलांना दाखवू शकला नाही.
हेही वाचा : 'तारक मेहता...'चा ओरिजनल 'सोढी' गुरचरण किती मानधन घ्यायचा?
खरंतर जेव्हा प्रसादला हे पुस्तक मिळालं तेव्हा तो ते वडिलांना दाखवण्यासाठी खूप उस्तुक होता. तो घरी त्याच्या वडिलांची प्रतिक्षा करत होता. पण ते कामावर होते. त्यांची दुधाची डेरी होती. बराच वेळ बाबा आले नाही आणि वाढत्या उत्सुकतेमुळे तो सरळ डेअरीवरच गेला. पण तिथे गेल्यानंतर बाबा घरी गेले असं त्याला सांगण्यात आलं. मग तिथून प्रसाद घरी आला तर ते शाखेत गेल्याचं कळलं. लगेच प्रसाद सायतल घेऊन शाखेत गेला. तिथेही त्याला त्याचे बाबा भेटले नाही. त्याला सांगण्यात आलं की दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह आहे त्यामुळे ते तिथे गेले आहेत. मग प्रसाद तिथेही गेला, पण परत तेच तिथेही कळलं की बाबा घरी गेलेत. अखेर निराश झालेला प्रसाद घरी जाऊन बाबांची प्रतिक्षा करु लागला. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजुर होतं. त्याच रात्री प्रसादच्या घरी त्याच्या बाबांच्या निधनाची बातमी आली. ही बातमी ऐकल्यानंतर प्रसाद आणि त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमिन हादरली.
प्रसादच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियानं 2001 मध्ये दिलेल्या एका बातमीत म्हटलं होतं की 1999 मध्ये छोटा शकीलनं शिवसेना नेत्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी काही शिवसेना नेते आणि शाखाप्रमुखांच्या हत्येची सुपारी दिली होती. ही सुपारी त्यानं काश्मिरी दहशतवादी संघटनेला दिली होती. यात प्रसादचे वडील महादेल खांडेकर यांचे देखील नाव होते. यावेळी तपासात एक गोष्ट कळली की गुरप्रीत सिंग उर्फ मिक्की या काश्मिरी दहशतवाद्यानं त्यांची हत्या केली होती. तर 2001 मध्ये दिल्ली पोलिसांनी गुरप्रीतला अटक केली. या गोष्टीला दोन दशकांपेक्षा जास्त काळ झाला असला तरी प्रसाद किंवा त्याचं कुटुंब हे त्याच्या वडिलांना विसरू शकत नाही.