'या' कारणामुळे टीव्ही शोमध्ये दिसत नाहीत रेखा

रेखा यांच्या उत्तरामुळे सगळेच स्तब्ध 

Updated: Nov 26, 2020, 08:56 PM IST
'या' कारणामुळे टीव्ही शोमध्ये दिसत नाहीत रेखा

मुंबई : कॉमेडिअन आणि अभिनेता कपिल शर्मा  (Kapil Sharma) कायमच चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहत असतात. या शोमध्ये अनेक कलाकार खासगी आयुष्यातील खूप गोष्टी शेअर करत असतात. यावेळी कपिल शर्माने आपल्या शोमधील रेखा (Rekha) यांचा जुना व्हिडिओ शेअर केलाय. 

कपिल शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. त्याने रेखा यांच्याशी संबंधित जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कपिल शर्माने रेखा यांना आपण टीव्ही शोमध्ये का जात नाही? असा प्रश्न विचारला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

यावर रेखा यांनी अतिशय मजेदार उत्तर दिलं. रेखा म्हणतात की,' मी काही दाखवण्याची गोष्ट नाही.' यावर कपिल म्हणतो की, मग आम्हाला तर काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला हवं. यानंतर कपिल रेखाला विचारतो की, तुम्ही तुमच्या चाहत्यांना कसे मॅनेज करता. रेखा यावर बोलताना म्हणते की, कपिल तू हे माझ्याबद्दल बोलतोस पण तुझ्याबद्दलचं काय? तिथेच रेखा कपिलसोबत मस्ती करताना दिसते.