'या' व्यक्तींसाठी बदाम खाणं घातक

बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं पण...

Updated: Dec 23, 2020, 12:26 PM IST
'या' व्यक्तींसाठी बदाम खाणं घातक title=

मुंबई : बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. लहान मुलांना देखील बदामाचं नियमित सेवन लाभदायक असतं. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींना बदाम खाणं फायदेशीर ठरतं तर काहींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या आहारात बदामाचा समावेश करायला हवा की नको याचा सल्ला डॉक्टरांकडून घेणं महत्त्वाचं आहे. 

- उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे. कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात. अशावेळी बदाम ही समस्या अधिक वाढवेल.

- मूतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असल्यास किंवा पित्ताशया संबंधित काही त्रास असल्यास बदामाचे सेवन करणे टाळा. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते.

- पचनासंबंधित काही समस्या असल्यास बदाम खाऊ नका. बदामात फायबर्स अधिक प्रमाण असल्याने समस्या वाढतील. अ‍ॅसिडीटीची समस्या असल्यास बदाम खाणे टाळावे.

- बदामात कॅलरीज आणि फॅट्स असल्याने स्थूलतेची समस्या असलेल्यांनी बदाम खाऊ नयेत.