काळ्या मनुका खाण्याचे फायदे

काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनवल्या जातात. काळ्या मनुकांमध्येही अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे दररोज मनुका खाल्ल्याने शरीरास मोठे फायदे होतात. 

Updated: Aug 22, 2017, 11:08 PM IST
काळ्या मनुका खाण्याचे फायदे title=

मुंबई : काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनवल्या जातात. काळ्या मनुकांमध्येही अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे दररोज मनुका खाल्ल्याने शरीरास मोठे फायदे होतात. 

मनुका खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मनुकांमध्ये पोट
पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. 

हृद्यविकाराचा त्रास असल्यास त्यात मनुका फायदेशीर आहेत. 

मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

मनुकांमधील अँटीऑक्सिंड्टसमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून वाचता येते. यातील अॅण्टीबॅक्टेरियल गुणांमुळे सर्दी-खोकला बरा होऊ शकतो.

मनुकांमधील कॅरोटिन द्रव डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. 

यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. दररोज मनुका खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स दूर होऊन केसगळतीची समस्याही दूर होते