Bloody Piles Treatment : बदललेली जीवनशैली, त्यात बाहेरच्या अनहेल्दी खाण्याची सवय यामुळे मूळव्याधाची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत आहे. तरुण असो किंवा वृद्ध कोणालाही कुठल्याही वयात मूळव्याध होतोय. एका अभ्यासानुसार, वयाच्या 50 वर्षांनंतर 50 टक्के लोकांना मूळव्याधची समस्या आहे. यावर वेळीच उपचार घेतला नाही तर संसर्ग वाढतो आणि गंभीर स्वरुप घेतो. अनेकांना वेदना आणि सूज यासोबत रक्तस्त्रावची समस्या निर्माण होते. मूळव्याधमुळे गुदद्वारातील रक्तवाहिन्या मोठ्या होतात, त्यामुळे सूज येते. असह्य वेदना आणि बसण्यासही रुग्णांना त्रास होतो. जास्त प्रमाणात हा त्रास वाढल्यास त्या जागेवरुन रक्तस्त्राव होतो. आयुर्वेदात या समस्येवर घरगुती उपाय सांगण्यात आलेय. प्रत्येकाच्या घरात हळद असते, या पिवळ्या हळदीपासून काही उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील. (Bloody Piles Treatment Are you suffering from piles These yellow things in the kitchen will eliminate the problem)
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून मूळव्याधमुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम देण्यास मदत मिळते. हळदीमध्ये दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट, अँटीट्यूमर, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटीबायोटिक आणि अँटी-कर्करोगविरोधी असे औषधी गुणधर्म आपल्याला फायदेशीर ठरते.
अर्धा चमचा कोरफडमध्ये एक चमचा हळद मिक्स करुन ज्या ठिकाणी त्रास आहे तिथे लावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत मिळते.
नारळाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने हळदीसोबत मिक्स केलेले हे क्रिम तुम्हाला वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतं. हे मिक्स प्रभावित भागाला लावा आणि काही तास ठेवल्यानंतर धुवून टाका.
कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने वेदना आणि सूजपासून आराम मिळतो. त्यासाठी अर्धा चमचा कांद्याच्या रसात 1 चमचा हळद आणि 1-2 चमचा मोहरीचे तेल मिक्स करुन प्रभावित भागाला लावा.
मोहरीच्या तेलात हळद मिसळून प्रभावित भागावर लावल्यास मूळव्याधातून होणारा रक्तस्त्राव थांबण्यास मदत मिळते. हळद आणि मोहरीच्या तेल हे दाहक-विरोधी औषधी गुणधर्म असल्याने फायदेशीर ठरते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)