Cancer Awareness Day: कर्करोग हा गंभीर आजार आहे. कर्करोग टाळण्यासाठी आधीच काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी कर्करोगाविषयी जागरुकता असणे महत्त्वाचे आहे. आज कर्करोग जागरुकता दिवस आहे. अलीकडेच जाहीर केलेल्या अभ्यासानुसार, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिडचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. लंडनमध्ये गेल्या 10 वर्षांपासून 250000हून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले. त्यातील 3 हजाराहून अधिक लोकांना एकाच प्रकारच्या कर्करोगाने त्रस्त आहेत.
ओमेगा-3S मध्ये कोलनचा स्तर कमी असतो. त्यामुळं फुफ्फुसाचा कर्करोग व पाचनसंस्थेसंबंधीत कर्करोगाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. तर, ओमेगा 6 फॅटि अॅसिडमुळं मेंदू, त्वचा, मूत्राशय आणि 14 विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी आहे. त्यामुळं संशोधकांनी हा निरोगी फॅटी अॅसिडचा आहारात अधिकाअधिक समावेश करावा, असं अवाहन केलं आहे.
ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड हे त्यातील निरोगी गुणधर्मामुळं ओळखलं जातं. अभ्यासात समोर आलं आहे की, मद्यपान, वजन जास्त असणे, व्यायामाचा अभाव असं एखाद्या व्यक्तीची जीवनशैली असूनही शरीरातील हेल्दी फॅट्सदेखील कर्करोगापासून बचाव करते.
मात्र, शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिडची उच्च पातळी असण्याचेही तोटे असतात. हेल्दी फॅट्सच्या उच्च पातळीमुळंही पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड संरक्षणात्मक प्रभाव जास्त असल्याचे संशोधनात दिसून आलं आहे.
ओमेगा -3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड शरीरात निर्माण होणारी जळजळ कमी करण्यासाठी आणि पेशींच्या वाढीचे नियमन करण्यास मदत करतात. हे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करण्यात मदत करु शकतात.
ओमेगा-3 मासे, ड्रायफ्रुट्स, बिया, काही वनस्पती तेल यात हेल्दी फॅट असतात. हृदय आणि मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठा रोजच्या आहारात अक्रोड, आळशीच्या बिया, रावस (Salmon Fish) यांचा समावेश करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)