कोरोना रुग्णांना थांबून थांबून ऑक्सिजन मिळाला तर काय होईल परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

 देशात कोरोना  (Cornavirus in lndia) रुग्णांची संख्या दिवसागणिक पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती संख्या चिंता बनली आहे. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा.

Updated: Apr 22, 2021, 02:47 PM IST
कोरोना रुग्णांना थांबून थांबून ऑक्सिजन मिळाला तर काय होईल परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात title=
संग्रहित फोटो

मुंबई :  देशात कोरोना  (Cornavirus in lndia) रुग्णांची संख्या दिवसागणिक पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती संख्या चिंता बनली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. देशात अनेक राज्यांत ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा जावण आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढताना रेमडेसिवीर औषध आणि ऑक्सिजनची कमी यामुळे रुग्ण दगावत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांना  (covid-19) थांबून थांबून ऑक्सिजन दिला तर काय परिणाम होईल, याबाबत काहींही सल्ला दिला आहे. तज्ज्ञ काय सांगता ते जाणून घ्या.

कोरोनाला रोखण्यासाठी आता 18 वर्षांवरील लोकांना एक मेपासून लस देण्यात येणार आहे.  देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) आलेख रोखण्यासाठी भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना १ मे पासून कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.  दरम्यान, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रूग्णांना मधूनमधून ऑक्सिजन मिळाल्यास काय परिणाम होईल, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन हे एखाद्या औषधासारखे आहे, असे देशातील सर्वोच्च डॉक्टरांनी बुधवारी सांगितले. ऑक्सिजन मधूनमधून थांबविणे फायद्याचे ठरणार नाही. ते म्हणाले की असा कोणताही डेटा नाही, जो कोविड -19 रूग्णांना तो कोणत्याही प्रकारे उपयुक्त किंवा उपयोगी ठरेल हे दर्शविते, म्हणून हा निरुपयोगी सल्ला आहे.

एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला

एम्सचे (AIIMS) डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोविड-19 (covid-19) रुग्ण रेमडेसिवीरसारखी औषधे न वापरताही बरे होऊ शकतात. ते म्हणाले की कोणत्याही विशिष्ट उपचाराशिवाय 85 टक्के लोक बरे होऊ शकतात. ते म्हणाले की त्यांच्यापैकी बहुतेकांना सर्दी, घसा खवखवणे इत्यादी सारखी सामान्य लक्षणे दिसतात आणि पाच ते सात दिवसांत ते उपचारांद्वारे या लक्षणांवर मात करु शकतात. केवळ 15 टक्के रुग्णांना आजाराच्या मध्यम टप्प्यात सामोरे जावे लागते.

गुलेरिया म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, निरोगी लोक, ज्यांचे ऑक्सिजन सेचुरेशन 94 टक्के आहे, त्यांना  सेचुरेशन 98-99 टक्के पर्यंत राखण्यासाठी उच्च प्रवाहाचा ऑक्सिजन घेण्याची गरज नाही. ज्यांचे ऑक्सिजन सेचुरेशन पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांचे जवळून परीक्षण करणे आवश्यक आहे. गुलेरिया म्हणाले की ऑक्सिजन हा एक उपाय आहे. हे औषधाप्रमाणे आहे. मधूनमधून वापर केल्यास फायदा होत नाही.

ऑक्सिजनचा योग्य वापर करा

मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान म्हणाले की, जर आपण ऑक्सिजनचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तर देशात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे आहे. त्यांनी 'सुरक्षा कवच' म्हणून ऑक्सिजनचा वापर करु नये, अशी विनंती त्यांनी लोकांना केली. त्रेहान म्हणाले की, ऑक्सिजनच्या अपव्ययामुळे ज्या लोकांना जास्त गरज आहे ते ऑक्सिजनपासून वंचित राहत आहे.