'या' गोष्टी चहासोबत घेणे टाळा, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

चहा पिताना चुकुनही 'या' गोष्टी खाऊ नका, होऊ शकतं मोठं नुकसान

Updated: Jul 11, 2022, 08:48 PM IST
'या' गोष्टी चहासोबत घेणे टाळा, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक title=

मुंबई : चहा प्रत्येकालाचं आवडते, एखाद दुसरा अपवाद असू शकतो. मात्र चहा घेणाऱ्यांनी हे नक्की एकलं असेल जास्त चहा हानिकारक असते. मात्र चहासोबत खाण्यात येणाऱ्या या गोष्टी सुद्धा आरोग्याला हानी पोहोचवत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहा पिताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती देणार आहोत.  

काजू
चहासोबत ड्रायफ्रुट्सचे सेवन टाळा. जर तुम्ही चहासोबत ड्रायफ्रुट्स खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

लोहयुक्त अन्न 
चहासोबत लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावेत. खरं तर, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सॅलेट्स असतात, जे लोह शोषण रोखू शकतात. त्यामुळे नट, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, कडधान्ये यासारख्या गोष्टी चहासोबत घेणे टाळा.

लिंबू पासून अंतर
चहासोबत लिंबू किंवा आंबट पदार्थ खाणे टाळा. लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते.