मुंबई : निरोगी राहण्याचा पहिला नियम म्हणजे तुमच्या आहाराकडे लक्ष देणे. जर तुम्ही वेळेवर आणि हेल्दी फूड खाल्लात तर तुम्हाला आरोग्यासंबंधीत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे तुम्ही काय खाता, केव्हा खाता या दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. असे अनेक लोक आहेत जे सकाळी वेळेवर नाष्टा करत नाहीत, तर काही लोक नाष्टा तर करतात परंतु त्यांना यावेळी काय खायचं हे माहित नसतं. ज्यामुळे बऱ्यातदा लोक एकाच वेळी एकाच प्रकारच अन्न खातात, ज्याचा परिणाम शरीरावर आणि पचनक्रियेवर होतो.
दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. हा दिवसातील तुमचा पहिला मिल आहे. परंतु नाष्ट्यामध्ये काही गोष्टी खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे. चला या कोणत्या गोष्टी आहेत, ते जाणून घेऊया.
अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आम्ही तुम्हाला येथे सांगू की तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन नाश्त्यात करू नये? चला जाणून घेऊया.
नाश्त्यात हे पदार्थ खाऊ नका.
जेव्हा लोक घाईत असतात तेव्हा ते पॅकेटमधील किंवा आधीच तयार केलेले फळांचा रस पितात. लोकांना वाटते की, असं केल्याने त्यांचं शरीर चांगलं राहिल. परंतु तुम्हाला माहित आहे की असं करणं चांगलं नाही. कारण नाश्त्यात नेहमी असे अन्न खावे जे तुमचे पोट बऱ्याच काळासाठी भरलेलं ठेवेल.
अशा परिस्थितीत जर तुम्ही फळांचा रस प्यायला तर काही वेळाने तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होऊ लागते. म्हणूनच नाश्त्यात जड काहीतरी खावे. परंतु ज्यूस पिऊ नये.
न्याहारीमध्ये बटर टोस्ट खाणे भारतीय घरांमध्ये सामान्य आहे, परंतु प्रत्यक्षात ते आपल्या आरोग्यासाठी हे फारसे फायदेशीर नाही. बाजारात मिळणाऱ्या बटरमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असले तरी, ब्रेड हे मैद्यापासून तयार केला जातो. अशा परिस्थितीत टोस्ट केलेले ब्रेड खाल्ले, तर ते तुमचे शरीर लठ्ठ बनवते. त्यामुळे ते टाळा.
दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही साखरयुक्त पदार्थ किंवा उच्च शुद्ध साखरयुक्त तृणधान्ये पूर्णपणे टाळली पाहिजेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा तुम्ही नाश्त्यामध्ये जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करता, तेव्हा तुमचे वजन वाढण्याची शक्यता वाढते.