Benefits of eating Banana : निरोगी राहण्यासाठी आपण पुरेशी झोप, जेवण आणि व्यायाम याचा योग्य संतुलन करणं गरजेचं आहे. आयुर्वेदात खाण्या पिण्याबद्दल अनेक नियम आहे. या नियमाचं पालन केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे. जेवण, फळं आणि अगदी दूध पिण्याचीही योग्य वेळ असतं. आपण दैनंदिन जीवनात रोज अगदी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत झटपट ऊर्जेसाठी केळीचं सेवन करतो. पण तुम्हाला माहिती आहे का केळी खाण्याची एक वेळ असते ते. या लेखातून केळी खाण्याची योग्य कोणती, केळी खाण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत. (Do you know the right time to eat banana to get double health benefits)
केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येत नाही. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आढळते, जे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आपल्याला कमी थकवा जाणवतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास जास्त थकवा जाणवत नाही.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रिबोफ्लेविन देखील असतात. केळीमध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३ टक्के प्रथिने, २४.७ टक्के कार्बोहायड्रेट असतात.
केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते. ते खाल्ल्याने पोट लवकर भरते. ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यामुळे सकाळचा नाश्ता चुकला असेल तर केळी नक्की खा, कारण केळी खाल्ल्याने झटपट एनर्जी मिळते.
केळीचे सेवन केल्याने लोकं डिप्रेशनपासून लांब राहतात. रुग्णांना देखील यामुळे आराम मिळतो हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केळ्यामध्ये असे प्रोटीन आढळते, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. यामुळेच डिप्रेशनचा रुग्ण जेव्हा केळी खातो तेव्हा त्याला आराम मिळतो.
केळीमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्ही दररोज रात्री झोपताना दुधासोबत केळीचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल.
केळ्यामध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया योग्य ठेवते. योग्य पचनशक्ती असण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व आजारांपासून दूर राहता.
अॅनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आणि यावर चांगला उपाय म्हणजे केळी. केळीचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता हळूहळू कमी होते आणि तुमची अॅनिमियाची समस्या देखील सुधारते.
ब्रेकफास्टनंतर केळीचे सेवन करु शकता. केळी खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 8 ते 9.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)