Health News : मधुमेह हा एक असा आजार आहे, जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. या आजारावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर तो मृत्यूचे कारणही बनू शकतो. अंडी ही अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. अंडी ही अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना नाश्त्यात खायला आवडते. एका नवीन अभ्यासानुसार, जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक दररोज एक किंवा अधिक अंडी खातात, म्हणजे सुमारे 50 ग्रॅम, त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढू शकतो. (How Eggs Increase risk of Diabetes)
अंड्यांमध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी12, बी6, कॅल्शियम, फोलेट, रिबोफ्लेविन, जस्त आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटी सोबत हा अभ्यास केला. हा अभ्यास 1991 ते 2009 या कालावधीत करण्यात आला. एपिडेमियोलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ मिंग ली म्हणतात की, जर तुम्हाला टाइप 2 मधुमेह असेल तर त्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे आहारातील कोणत्या घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते हे समजून घेणे आवश्यक आहे.
दररोज अंडी खात असाल तर...
अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरी. एकूणच, मधुमेहाचे रुग्ण अंडी खाऊ शकतात असा निष्कर्ष निघतो, परंतू शास्त्रज्ञांनी सांगितले की, जे लोक दररोज सरासरी 38 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात, त्यांना मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांनी वाढतो. तर जे लोक 50 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात किंवा दिवसातून एक किंवा अधिक अंडी खातात त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढला आहे.
दरम्यान, तुम्ही दररोज अंडी खात असाल तर तुम्ही कोलेस्ट्रॉलची पातळी लवकर वाढवण्याचे काम करत आहात. अंड्याचे सेवन आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे आणि कोणत्या कारणामुळे होतो, यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितलंय. जर तुम्ही आधीच हृदयाचे रुग्ण असाल तर अंडी खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.