मुंबई : चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. गोडाच्या पदार्थांमध्ये,लाडवांमध्ये चारोळी वापरली जाते. मात्र केवळ गोडाच्या पदार्थांपुरता चारोळी मर्यादीत नाही. अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील चारोळीचा नियमित आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत.
चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि नियासिन घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो.
शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी मदत करते. शारीरिक वाढीसाठीदेखील त्याचा फायदा होतो.
रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.
पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भरून काढण्यासाठीही चारोळी फायदेशीर आहे.
तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी 3-4 दाणे चघळा.
डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात. चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही.