मुंबई : अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित 10 दिवस भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
#1 अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
#2 अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
#3 अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
#4 अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
#5 अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
#6 ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.