High cholesterol: सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) लोकांना त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये. अशावेळी लोकं जे मिळेल ते अन्न खातात. याचा परिणाम लोकांच्या शरीरावर होताना दिसतो. यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं (cholesterol) प्रमाण देखील वाढतं, जे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. मात्र तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात बदल होतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत तुमच्या हातामध्ये दिसून येतात.
तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं की, तुमच्या नखांचा रंग बदलतो. यावेळी तुमच्या नखांचा रंग पिवळा दिसू शकतो. याचा अर्थ तुमच्या शरीरात योग्यरित्या रक्त-प्रवाह होत नाहीये. शरीरात योग्य प्रकारे रक्त पुरवठा झाला नाही की, नखांचा रंग पिवळ होऊ लागतो.
तुमच्या शरीराच्या काही भागांमध्ये रक्तपुरवठा पुरेश्या प्रमाणात झाला नाही की, तुमच्या हाताला मुंग्या येण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या शरीरातील अवयवांना योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी हाताला मुंग्या येऊ शकतात.
तुमच्या शरीराल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, रक्तवाहिन्या ब्लॉक देखील होतात. अशावेळी तुमच्या हातांमध्ये अचानक वेदना जाणवू शकतात. जर तुम्हालाही अशा वेदना जाणवल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.