Leg Shaking Habit : नेहमी पाय हलवण्याची सवय असते की गंभीर समस्या, जाणून घ्या

Leg Shaking Habit : बहुतेक लोकांना हेच कळत नाही की शेवटी असं का होतं?, त्यांना ती सवय वाटते.मात्र तसे नाही आहे. खरं तर,पाय थरथरण्याची समस्या ही सवय नसून गंभीर आजाराचे लक्षण आहे. ही सवय नेमक्या कोणत्या आजाराचे लक्षण आहे, हे जाणून घेऊयात.   

Updated: Dec 28, 2022, 09:53 PM IST
Leg Shaking Habit : नेहमी पाय हलवण्याची सवय असते की गंभीर समस्या, जाणून घ्या title=

Leg Shaking Habit Reason : अनेकांना पाय हलवण्याची (Leg Shaking Habit) सवय असते. ऑफिसमध्ये बसलेला असो अथवा घरी अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. काहींना असे वाटते की ही त्यांची सवय बनलेली असते. बहुतेक लोकांना हेच कळत नाही की शेवटी असं का होतं?, त्यांना ती सवय वाटते.मात्र तसे नाही आहे. खरं तर,पाय थरथरण्याची समस्या ही सवय नसून गंभीर आजाराचे लक्षण आहे. ही सवय नेमक्या कोणत्या आजाराचे लक्षण आहे, हे जाणून घेऊयात. 

'हे' गंभीर आजार असण्याची शक्यता

अँक्झायटी

काही लोक अँक्झायटी म्हणजेच चिंता त्रस्त असतात. जेव्हा हे व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल विचार करू लागतात, तेव्हा त्यांचे पाय थरथरू (Leg Shaking Habit) लागतात. त्यामुळे अशी समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांना दाखवून घ्यावे. 

डायबेटिक न्यूरोपॅथी

डायबेटिक न्यूरोपॅथी असलेले रूग्ण नेहमी पाय हलवताना दिसतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मधुमेह नियंत्रणात राहत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्याच्या नसा काम करणे बंद करतात, तेव्हा तो अस्वस्थतेने पाय हलवतो

पार्किन्सन्सचा आजार

एखाद्याचे पाय थरथरणे हे पार्किन्सन्सच्या आजाराला सूचित करते.हात-पायांमध्ये जडपणा येतो, त्यामुळे व्यक्ती सतत पाय हलवते ते दृश्यमान आहे.पार्किन्सन्सच्या आजारात माणसाची मज्जासंस्था किंवा म्हणा ना की मज्जातंतू खूप परिणामकारक होतात, त्यामुळे माणसांच्या शरीरात काही अनियंत्रित हालचाली होतात.

हृदयविकाराचा धोका

पाय थरथरल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने झोपण्यापूर्वी 200 ते 300 वेळा पाय हलवले आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)