मुंबई : आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण विविध पद्धतींचा उपयोग करतो. यावेळी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्ट्सपासून ते YouTube वरील टिप्सचाही वापर केला जातो. मात्र प्रत्येक प्रकरणांमध्ये, या गोष्टी फायदेशीर ठरतीलच असं नाही. पण या सगळ्यात एक अशी पद्धत आहे जी कधीच अपयशी ठरत नाही, ती म्हणजे मून चार्ज वॉटर.
आयुर्वेदात मून चार्ज वॉटर शारीरिक आणि इमोशनल आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलंय. मून चार्ज वॉटर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवून ते तयार केलं जातं. यामुळे चंद्राच्या सकारात्मक उर्जेने पाणी चार्ज होतं असं मानलं जातं.
हे करत असताना, ग्रहणाच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात पाणी ठेवू नये. याचं कारण असं की, त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याच वेळी, पौर्णिमेच्या दिवशी, चंद्राची ऊर्जा वाढते, ज्यामुळे त्याच्या प्रकाशात ठेवलेल्या पाण्याची गुणवत्ता वाढू शकते.
आयुर्वेद डॉक्टर नितिका कोहली यांनी मून चार्ज वॉटर हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं सांगितलंय. हे पाणी कसं फायदेशीर आहे याबाबतंही त्यांनी माहिती दिली आहे.
डॉ. नितिका यांनी सांगितलं की, ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी मून चार्ज वॉटर खूप उपयुक्त ठरतं. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे, स्त्रियांच्या मासिक चक्र चंद्राच्या 28 दिवसांच्या चक्राशी संबंधित असतं.
डॉ. नितिका म्हणतात, PCOS ची समस्या असलेल्या महिलांनी हे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास खूप फायदा होतो. पीसीओएस हा महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे होणारा त्रास आहे, ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असंही म्हणतात.
मून चार्ज वॉटर त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी प्रभावी आहे. डॉ. कोहली म्हणतात की, जर तुम्ही चंद्राच्या प्रकाशात पाणी ठेवलं आणि सौंदर्य नियमानुसार पाणी प्यायलात तर तुमच्या त्वचेवर ग्लो येऊ शकतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)