मुंबई : अनियमित मासिक पाळी ही समस्या अनेक महिलांमध्ये आढळून येते. अनेक महिलांना पाळी दर महिन्यामध्ये उशिरा येते. अशा महिलांपैकी अधिक महिलांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या असण्याची शक्यता असते.
या समस्येत हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होतं. याचा परिणाम मासिक पाळीवर होतो आणि अनेक महिलांना मासिक पाळी उशिरा येते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या आजारात वजन आणि रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. म्हणून यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ही समस्या असल्यास वजन निंयत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. याशिवाय ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी चेरी, जर्दाळू, संत्री खाणं उपयुक्त ठरतं.”