मुंबई : गोवा सरकारने माशांच्या आयातीवर 15 दिवसांसाठी निर्बंध घातल्याने मासेप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. फार्मेलिनयुक्त मासे बाजारात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर होणारा धोका लक्षात घेता सरकारने सतर्कचा आदेश दिला आहे.
फार्मेलिन हे मेथॉनल गॅसचा एक प्रकार आहे. माशांना ताजं दिसावं म्हणून त्याचा वापर केला जातो. पेशी डिकम्पोज्ड होऊ नयेत म्हणून फार्मेलिनचा वापर केला जातो. मासे जेव्हा बाहेर पाठवले जातात तेव्हा अधिक काळ ताजे दिसून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हे केमिकल वापरले जाते. मात्र आहारातून मानवी शरीरात हे केमिकल गेल्यास किडनी, श्वासनलिकेवर, मेंदूवर त्याचा परिणाम होतो. हेल्थ एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, फार्मेलिन घटकाचा शरीरावर दूरगामी परिणाम झाल्यास त्यामधून कॅन्सरचा धोका बळावू शकतो. सोबतच त्वचा, फुफ्फुस आणि किडनीचं आरोग्यदेखील बिघडतं. या '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक!
फुफ्फुसांच्या आरोग्यावर फार्मेलिनचा परिणाम दिसून येतो. यामुळे अनेक फुफ्फुसांच्या आजारांना आमंत्रण मिळू शकते.
पोटामध्ये अल्सर वाढण्याचा धोका असतो. पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.
फार्मेलिन घटकामुळे अनेक त्वचाविकारांचा धोका बळावतो.
खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी कोणते केमिकल वापरत असल्यास
त्याचा पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो.