Vitamin B12 Deficiency : आपली निरोगी राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. आता आपल्याला ते सगळे पोषक तत्वं ही आपण जे खातो त्यातून होते. आपल्या आहारात जर नेहमी एकच गोष्ट असेल तर त्यातून आपल्याला फक्त एकाच प्रकारचं पोषक तत्वं मिळतील पण जर आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या तर आपल्या आरोग्याला सगळी पोषक तत्वे मिळतील. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का की व्हिटॅमिन बी 12 आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे. जर आपल्या आहारात बी 12 ची कमी असेल तर त्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण याविषयीच जाणार आहोत की कोणत्या अन्न पदार्थांपासून आपल्या शरीरातील बी 12 ची कमी पूर्ण होईल.
आपल्याला दिवसभरातून 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 मिळायला हवं. कारण ते आपल्यासाठी आवश्यक आहे. जर आपल्याला बी 12 पुरेसं मिळालं नाही तर आपल्याला अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, जुलाब होणे, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे अशक्तपणा वाटू लागतो. बी 12 हवं असेल तर कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घेऊया...
दुग्धजन्य पदार्थ
व्हिटॅमिन बी 12 हे दूधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोजच्या जीवनात तुम्ही दुधाच्या पदार्थांचा आहार करा. ज्यात दूध, दही, पनीर आणि चिझचा समावेश करा. त्यानं तुमच्या शरीरात असलेली बी 12 ची कमी नक्कीच पूर्ण होईल.
अंडी
बरेच लोक नाश्त्यात अंड्यांचे सेवन करतात. पण अनेकांना वाटतं की त्यात हीट जास्त असते. पण तुम्हाला माहितीये का त्यात सगळ्यात जास्त प्रोटीन, नॅच्युरल फॅट आणि मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ्या भागात व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात असते.
मांस
मांसहार करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. इतकंच नाही तर त्यासोबत फॅट्सही मिळतात. अनेक लोकांना वाटतं मांस मध्ये फक्त प्रोटीन आणि फॅट्स असतात पण त्यात बी 12 मोठ्या प्रमाणात असते हे अनेकांना माहित नाही. त्यामुळे बी 12 ची कमी असेल तर मांसचे सेवन करा.
टूना मासा
टूना माश्यात व्हिटॅमिन , प्रोटीन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. पण त्यात असणारं एक व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी 12 हे मोठ्या प्रमाणात असते. पण टूना मासा हा खूप महागही असतो त्याचे सगळ्यात जास्त सेवन हे जपानमध्ये करण्यात येते.
साल्मन मासा
साल्मन हा मासा फक्त समुद्रात नाही तर गोड्या पाण्यात देखील येतो. या माश्यात व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय त्यात प्रोटीन आणि ओमेगा-3, फॅटी अॅसिड देखील खूप प्रमाणात असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)