8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?

8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी...   

सायली पाटील | Updated: Jan 16, 2025, 12:50 PM IST
8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?  title=
8th pay commission might get replaced central govt may explore new mechanism know latest update

8th Pay Commission: (Government Jobs) सरकारी कर्मचाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटण्यामागचं मुख्य कारण असतं ते म्हणजे कर्मचाऱ्यांना पगारासमवेत मिळणारे भत्ते आणि इतर अनेक सुविधा. दिवाळी बोनस असो किंवा विविध वेतन आयोगांअंतर्गत वाढणारा पगाराचा आकडा असो. सरकारी नोकरी आणि त्याभोवती असणारं कुतूहाचं वलय या गोष्टी एकत्रच चर्चेचा विषय ठरतात. मागील काही दिवसांपासून हेच सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 

केंद्र शासनानं आठवा वेतन आयोग लागू केला जाण्याविषयीच्या अनेक चर्चा नाकारल्या असल्यामुळं आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. असं असलं तरीही यासाठीचा पर्यायही सरकार शोधत असून, त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांचं निवृत्ती वेतन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून सरकार विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

केंद्रानं हा पर्याय लागू केल्यास कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा चांगल्या फरकानं वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. झी बिझनेसनं सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नव्या सूत्राच्या आधारे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली जाणार आहे. काही वर्षांपासून वेतन आयोगाचा कार्यकाळ हा 10 वर्षांचा असून, (7th Pay Commission) अर्थात सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू असून, 2025 च्या डिसेंबर महिन्यात या वेतन आयोगाचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर 

वेतन आयोगाचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाची मागणी उचलून धरली होती. पण, सरकारच्या निरीक्षणानुसार प्रत्येक वेळी वेतन आयोगाचा कार्यकाळ 10 वर्षांचाच असणं आवश्यक नाही. याच मतामुळं सध्या कर्मचारी संघटना आणि सरकारी कार्यकारिणीमध्ये मतभेदही पाहायला मिळत आहेत. 

वेतन आयोग नाही, तर मग कोणता पर्याय वापरणार सरकार? 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचारात नाही. दरम्यान, नवा वेतन आयोग लागू करणार नसला तरीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाला अनुसरून नवी सूत्र लागू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या सूत्रानुसार कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांचं निवृत्तीवेतन वेळोवेळी वाढत राहणार आहे. आता हा पगार आणि निवृत्तीवेतन मर्यादा नेमकी किती फरकानं वाढते आणि त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.