नवी दिल्ली : देशातील १३ मोठ्या बँकांनी नोटाबंदीनंतर सरकारकडे एक विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अहवाल सुपूर्द केलाय. यामुळे, काळ्या धनावर अंकुश ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मोठं यश मिळालंय, असं म्हणता येईल.
या अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे, अनेक शेल कंपन्यांचे १०० हून अधिक बँक खाते आहेत. नोटाबंदीपूर्वी या खात्यांत २२.०५ करोड रुपये जमा होते. नोटाबंदीनंतर या खात्यांत ४५७३ करोड रुपये जमा झालेत.
नंतर मात्र या खात्यांतून संपूर्ण रक्कम काढून घेण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, जवळपास २ लाख शेल कंपन्या सरकारच्या रडारवर होत्या.
- बँकांनी सरकारकडे सोपवलेला हा पहिलाच अहवाल आहे
- जवळपास ५८०० शेल कंपन्यांच्या १३१४० खात्यांचा चौकशी अहवाल बँकांनी सरकारकडे सोपवलाय.
- या १३ बँकांनी अनेक शेल कंपन्यांचे शंकास्पद ट्रान्झक्शन पकडलेत
- बँकांना ५८०० कंपन्यांच्या १३१४० खात्यांची माहिती मिळालीय