काँग्रेसला धक्का, या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला नोटा पेक्षा ही कमी मते

पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Updated: Apr 16, 2022, 04:26 PM IST
काँग्रेसला धक्का, या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला नोटा पेक्षा ही कमी मते title=

मुझफ्फरनगर : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोचहान (bochahan) विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलचे (RJD) उमेदवार अमर पासवान विजय झाला आहे. मतमोजणीत अमर पासवान यांना ८२,५६२ मते, भाजप उमेदवार बेबी कुमारी यांना ४५९०९ आणि व्हीआयपी पक्षाच्या उमेदवार गीता कुमारी यांना २९२७९ मते मिळाली आहेत. अशा प्रकारे अमर पासवान 36 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पण येथे काँग्रेस उमेदवार चर्चेत आला आहे. कारण त्याला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

मुसाफिर पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अमरकुमार यांना तिकीट देण्यात आले होते.  बोचहां विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावली होती. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, गिरीराज सिंह यांच्याशिवाय बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जसवाल आणि बिहार भाजपचे सर्व बडे नेते प्रचारासाठी बोचहांला पोहोचले होते. पण भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

काँग्रेस उमेदवार तरुण चौधरी यांना केवळ १ हजार ३३६ मते मिळाली. तर नोटाला २ हजार ९६७ मते मिळाली आहेत. म्हणजेच नोटाला मिळालेली मते ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे.