मथुरा : गाडी चालवताना डोळा लागणं किंवा अति स्पीडनं गाडी चालवणं महागात पडू शकतं. अनेकजण सलग गाडी चालवतात किंवा झोप झालेली नसताना गाडी चालवतात अशवेळी अपघाताचा धोका असतो. एक छोटीशी डुलकी जीवघेणी ठरू शकते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
यमुना एक्सप्रेस वेवरचालकाला डुलकी लागली. डोळे उघडताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. याचं कारण म्हणजे गाडीचे दोन तुकडे आणि त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि दुर्घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटलं आणि गाडी रेलिंगला आदळली. गाडीचे दोन तुकडे झाले. तर गाडी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात कंटेनरचा अर्धा भाग वरतीच अडकला होता.
रेलिंगला गाडीची धडक इतकी जोरात बसली होती की कंटेनरचा चक्काचूर होत अर्धा भाग खाली कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.