मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात उच्चस्तरीय केंद्रीय टीमची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहेत. हरियाणा, राजस्थान, गुजरात, मणिपूर आणि छत्तीसगड येथे ही टीम पाठवण्यात आली आहे.
हे तीन सदस्य असलेली टीम कोरोना चाचण्या, कोरोना संदर्भात उपाययोजना तसेच व्यवस्थापन यासाठी काम करणार आहेत. याबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करतील.
सध्या भारतात कोरोनाचे 4,40,962 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत 85,21,617 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील अंतर वाढत चाललं आहे. मंत्रालयाने म्हटलं की, 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 20,000 हून कमी रुग्ण आहेत. तर 7 राज्यांमध्ये 20,000 ते 50,000 पर्यंत रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45,209 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 43,493 रुग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 90,95,806 वर पोचली आहे. सध्या 4,40,962 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. आतापर्यंत 85,21,617 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचा बरे होण्याचं प्रमाण 93.69% आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,33,227 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.