Traffic Rules : अनेकदा रॅश ड्रायव्हिंग तर अनेक ठिकाणी सर्रास पाहायला मिळतं. जरा कुठे रस्त्यावर गाड्या थांबल्या, थोडंसं ट्राफिक जाम झालं तर सर्व वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवून त्रास देतात. मात्र आता कार किंवा बाईकमध्ये प्रेशर हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर लावले असतील तुम्हाला सांभाळून राहव लागणारा आहे. कारण दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी नवीन मोहिम सुरू केली असून, वाहनांमध्ये प्रेशर हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनमालकांविरुद्धर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबात दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट केले की, रस्त्यावरील नियम मोडणाऱ्यांना हा अल्टिमेटम दिला आहे. जर वाहनांमध्ये प्रेशर हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर असेल तर त्या वाहनधारकावर दंड आकारण्यात येईल. तसेच नियमांचे उल्लंघन करून आणि प्रेशर हॉर्न आणि सुधारित सायलेन्सर वापरून ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्यांना दंड आकारला जाईल, असे म्हटले आहे.
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही डॉक्टरांशी बोलू आणि त्यांना ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही डॉक्टरांकडून माहिती मिळवणार आहेत. त्यानंतर नागरिकांमध्ये आवाहन करू जेणेकरून त्यांनी सुधारित सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न वापरणे थांबवतील. अनेकदा तरुण बुलेट आणि इतर दुचाकींमध्ये असे हॉर्न आणि सायलेन्सर लावतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होते.