कोलकाता : नोटाबंदीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदरावर विपरीत परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जोरदार टीका केली आहे.
भारताची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याचं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्यावेळी विकासदरावर विपरीत परिणाम होईल, असं भाकित ममता बॅनर्जींनी वर्तवलं होतं. त्यावेळी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं ममता म्हणाल्यात.
My apprehension is now proven to be true regarding #demonetisation. My latest post on Facebook | https://t.co/ETIWUEuMja
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 1, 2017
नोटाबंदीनंतर जनतेच्या हाती काहीच लागलं नाही. उलट देशाची अर्थव्यवस्था दरीत ढकलण्यात आल्याचे ममतांनी ट्विटरवर म्हटले आहे.