दिल्ली : दिल्ली तिहार जेलमध्ये एका कैदीने मोबाईल गिळला, जेलमध्ये झाडाझडती होत असताना, आपण पकडले जावू, या भीतीने त्याने असं केलं असं सांगण्यात येत आहे. कैदीने मोबाईल गिळला आणि तो थेट पोटापर्यंत जावून पोहोचल्याचं तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं. आपण तपासणी दरम्यान पकडले जाणार, या भीतीने त्याने असं केलं, पण त्याला वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागलं, त्यात मोबाईल हा थेट पोटात पोहोचल्याचं समोर आलं.
कैद्याला तपासणीसाठी आणि पोटातला मोबाईल काढण्यासाठी १५ जानेवारीला जीबी पंत हॉस्पिटलला नेण्यात आलं. कैद्याचा पोटाचा एक्स-रे करण्यात आला, त्यात स्पष्ट मोबाईल पोटात असल्याचं दिसत होतं.
आता एवढा मोठा मोबाईल पोटातून सर्जरीने काढावा लागणार असं सर्वांना वाटत होतं, पण डॉक्टरांनी आपले प्रयत्न सुरु केले आणि एंडोस्कोपीने पोटातून तोंडावाटे मोबाईल काढण्यात डॉक्टर यशस्वी झाले.