मुंबई : देशातील (INDIA) कोरोना लसची (COVID-19 Vaccination) उपलब्धता वाढविण्यासाठी आणि लसीकरणाला (Vaccination) वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. इतर देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी अधिकृत परदेशी निर्मित कोविड -19 लस भारतात आयात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील लसीबरोबरच आता परदेशी लसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, अशा परदेशी निर्मित लसींच्या पहिल्या 100 लाभार्थ्यांच्या आरोग्यावर सात दिवस नजर ठेवली जाईल, त्यानंतर या लसींचा वापर देशात लसीकरण (COVID-19 Vaccination) कार्यक्रमात केला जाईल.
परदेशात विकसित किंवा तयार केलेल्या लसींना भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता देण्यात यावी आणि अमेरिका, युरोप, ब्रिटन किंवा जपानमधील अधिकाऱ्यांनी मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या तज्ज्ञ मंडळाने अशी शिफारस केली आहे की, मान्यताप्राप्त किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली तसेच सूचीत समावेश केलेल्या लसींना आयात करण्यात यावे.
मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, "या निर्णयामुळे भारताला अशा परदेशी लसींना लवकर प्रवेश मिळण्याची हमी मिळाली आहे आणि यामुळे विविध घटकांसह विविध प्रकारच्या औषधांची आयात करण्यास मदत होईल. भारतीय लस आणि परदेशी लस यामुळे कोरोना लसीकरणाला अधिक वेग येईल.
यावेळी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डच्या वापरास भारतात मान्यता देण्यात आली. भारताच्या औषध नियामकांनी सोमवारी काही अटींसह रशियाच्या कोविड -19 अँटी-स्पॉटनिक व्ही या लसीच्या मर्यादित आणीबाणी वापरास मान्यता दिली आहे.