Gold Price Today: सोन्याच्या-दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. आज मंगळवार 3 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मजबूतीकरणासोबतच मौल्यवान धातुत घसरण झाली होती. सोन्याचे दर काल 2660 डॉलर इतके होते. तर चांदी 31 डॉलरवर स्थिरावली होती. याच्या उलट आज परिस्थिती आहे. आज मल्टिकमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोनं वधारलं आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. त्यामुळं सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळं सराफा दुकानांमध्ये ग्राहकांत लगबग दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने ग्राहक पुन्हा हिरमुसले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 77,780 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज प्रतितोळा 71,300 रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली असून सोनं 58,340 रुपयांवर स्थिरावलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77, 780 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58, 340 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,130 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,778 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 834 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,224 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,672 रुपये
22 कॅरेट-71, 300 रुपये
24 कॅरेट- 77, 780 रुपये
18 कॅरेट- 58, 340 रुपये