Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

Updated: Sep 4, 2022, 08:54 AM IST
Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?  title=

Today Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. 999 शुद्धतेचे (24 कॅरेट) दहा ग्रॅम सोने 270 रुपयांनी महागून 50,890 विकले जात आहे. तर 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम चांदी आज 525 रुपयांनी महागले आहे. 

सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. यामध्ये एकदा सकाळी तर दुसऱ्यांदा संध्याकाळी जाहीर केले जातात. आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी goodreturns या वेबसाईटनुसार 995 शुद्धतेचे सोने आज 50,890 रुपयांना मिळत आहे, तर 916 शुद्धतेचे सोने 46,650 रुपये झाले आहे. 

सोन्या-चांदीच्या किमती किती वाढल्या?

सोन्या-चांदीच्या किमती रोज बदलतात. 999 आणि 995 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 250 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेच्या सोन्याचे दर 55 रुपयांनी वाढले आहेत. 750 शुद्धतेचे सोने 45 रुपयांनी महागले आहे, तर 585 शुद्धतेचे सोने 36 रुपयांनी महागले आहे.