मुंबई : जून महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचे दर 49 हजार रूपयांवर पोहोचले होते. पण आता सोन्याचे दर 47 हजार रूपयांपर्यंत घसरले आहेत. म्हणजे जून महिन्यात सोन्याचं दर 2 हजार रूपयांनी घसरले आहेत. चांदीमध्ये देखील कमालीची घट झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदी 72 हजार रूपये प्रति किलोवर गेली होती. आज चांदीचे दर 68 हजारांवर पोहोचले आहेत. म्हणजे जून महिन्यात चांदीच्या दरात 4 हजार रूपयांनी घट झाली आहे.
MCX गोल्डनुसार सोमवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 47008 रुपयांवर होते. पण आज सोन्याच्या दरांत 120 रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 46 हजार 890 रूपयांभोवती फिरत आहेत.
गेल्या आठवड्याचे सोन्याचे दर
सोमवार 47 हजार 74 रूपये
मंगळवार 47 हजार 11 रूपये
बुधवार 47 हजार 72 रूपये
गुरूवार 46 हजार 870 रूपये
शुक्रवार 46 हजार 925 रूपये
गेल्या आठवड्याचे चांदीचे दर
सोमवार 67 हजार 762 रूपये किलो
मंगळवार 67 हजार 515 रूपये किलो
बुधवार 67 हजार 932 रूपये किलो
गुरूवार 67 हजार 733 रूपये किलो
शुक्रवार 67 हजार 873 रूपये किलो