नवी दिल्ली : बाईक किंवा कारमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुम्ही देखील भटकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केवळ पेट्रोलपंपच नव्हे तर शहराच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पेट्रोल उपलब्ध होणार आहे. एखादा मोठा शॉपिंग मॉल तसेच रिटेल शॉपमधून तुम्ही पेट्रोल-डीझेल विकत घेऊ शकता. त्यामुळे पेट्रोलपंप शोधण्यासाठी तुम्हाला भटकण्याची गरज नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्रालयातर्फे पेट्रोल पंप उघडण्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत.
२००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी शिवाय २५० कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी देखील पेट्रोल पंप उघडू शकते. एक्सपर्ट कमिटीने यासंदर्भात पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडे शिफारस केली आहे. कमेटीने ३ एमटी एक्सप्लोरेशन किंवा ऑईल आणि गॅस सेक्टरमध्ये उपयोगी प्रोडक्शन संदर्भातील नियम शिथिल करण्याची शिफारस केली होती. यानुसार जरी एखादी कंपनी पेट्रोलियम सेक्टरमध्ये व्यवसाय करत नसेल तरीही तिला फ्यूयल रिटेल लायसन्स मिळू शकते.
दूर गावच्या भागांमध्ये ५ टक्के रिटेल आऊटलेट उघडण्याची पर्यायी व्यवस्था आहे. दूर क्षेत्रांतील रिटेल आऊटलेट नियमाअंतर्गत कंपनीला ३ कोटी बॅंक गॅरंटी जमा करावी लागणार आहे. नियमांअंतर्गत परवाना मिळाल्यानंतर कंपनीला २ वर्षाच्या आत रिमोट एरियामध्ये ५ टक्के आऊटलेट खोलणे गरजेचे आहे.
पेट्रोलियम मंत्रायलाने ऑक्टोबर २०१८ मध्ये फ्यूल रिटेलशी संबंधित नियमांत बदल करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी स्थापन केली होती. फ्यूल रिटेल मार्केटमध्ये स्पर्धा वाढवण्याच्या उद्देशाने ही समिती गठीत करण्यात आली होती. याचा थेट फायदा ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. तसेच शहरी ठिकाणी पेट्रोलपंपावर होणारी गर्दी देखील नियंत्रणात येणार आहे.